बारावीच्या निकालात चंद्रपूरची सानिका प्रथम #chandrapur #HSCexamresult #examresult #12thclassresult

Bhairav Diwase
0

https://www.adharnewsnetwork.com

Google ads.

चंद्रपूर:- बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी ऑनलाइन जाहीर झाला. यामध्ये जिल्ह्याचा निकाल ९०.६९ टक्के लागला. गतवर्षीच्या तुलनेत (९६.१० टक्के) यंदा निकाल घसरला. चंद्रपूर येथील सरदार पटेल क. महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची सानिका सुदेश झुलकंटीवार ही विद्यार्थिनी सर्वाधिक ९५.१७ टक्के घेऊन जिल्ह्यात प्रथम आली. त्यापाठोपाठ चंद्रपुरातील जनता क. महाविद्यालयातील विज्ञान शाखेची श्रुती ओमप्रकाश कामडी व बल्लारपूरची भालेराव पब्लिक स्कूलची श्रुती पांडे (वाणिज्य) या विद्यार्थिनींनी ९४.५० टक्के घेऊन द्वितीय आल्या. कला शाखेतून ब्रह्मपुरीतील लोकमान्य टिळक विद्यालयाच्या रोहित दौड याने सर्वाधिक ९१.८३ टक्के गुण मिळविले. गतवर्षीप्रमाणे बारावीच्या निकालात यंदाही मुलीच अव्वल ठरल्या आहेत.

यंदाच्या निकालात मूल तालुका (९६.७४ टक्के) अव्वल ठरला, तर चिमूर तालुका (८४.२१ टक्के) पिछाडीवर गेला. चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण २७ हजार ७९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील २७ हजार ३३२ विद्यार्थी परीक्षेला बसले. यामधील २४ हजार ७९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ७२९ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त केले आहे. ५ हजार २७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण तर १३ हजार ७०६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर विभागातून बारावीच्या निकालात चंद्रपूर जिल्हा गतवर्षीप्रमाणे यंदाही चौथ्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार, निकाल जाहीर झाल्यानंतर २६ मे पासून ५ जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २६ मे ते १४ जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)