मोठी अपडेट! अपघात दोन नाही तर तीन ट्रेनचा, 50 पेक्षा जास्त मृत्यू?Big update! Accident of not two but three trains, more than 50 dead?

Bhairav Diwase
0
ओडिशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेसचे 17 ते 18 डबे रुळावरून घसरले आणि दुसर्‍या रुळावर येणाऱ्या ट्रेनला धडकले. या अपघातात आतापर्यंत 50 प्रवाशांचा मृत्यू झाले असून सुमारे 200 प्रवासी जखमी झाले आहेत. परंतु अजूनही अधिकृत माहिती मिळाली नाही आहे. हा दोन ट्रेनचा नाही तर तीन ट्रेनचा अपघात झाला आहे. Big update! Accident of not two but three trains, more than 50 dead?

मालगाडीला धडकून कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

दोन पॅसेंजर ट्रेन आणि एक मालगाडी अशा तीन गाड्यांचा समावेश असलेला हा अपघात होता, अशी माहिती, ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की कोरोमंडल एक्स्प्रेस कोलकाताजवळील शालीमार स्टेशनवरून चेन्नई सेंट्रलकडे जात असताना बहंगा बाजार स्थानकावर संध्याकाळी ७.२० च्या सुमारास हा अपघात झाला.

रेल्वेमंत्र्यांची मोठी मदत जाहीर! मृतांच्या नातेवाईकांना १० लाख, गंभीर जखमींना २ लाख

दक्षिण पूर्व रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, अपघाती मदत गाड्या अपघातस्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. अपघातानंतर जलद बचाव कार्य राबवत ३०० प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे, तर ५० हून अधिक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. 700 प्रवासी अजूनही अडकून पडल्याची माहिती मिळत आहे.

ओडिशाचे विशेष मदत आयुक्त सत्यव्रत साहू यांनी सांगितले की, आतापर्यंत ४७ जणांना बालासोर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुळावरून घसरलेल्या डब्यांमध्ये अनेक लोक अडकले होते आणि स्थानिक लोक आपत्कालीन सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांची सुटका करण्यासाठी मदत करत होते, परंतु अंधारामुळे ऑपरेशनमध्ये अडथळे येत होते. या अपघातात सुमारे २०० जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अजून मदतकार्य सुरू आहे त्यामुळे जखमी आणि मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)