नृत्यांगण डान्स स्कूल चे सुयश, ‘कथक’ नृत्य सत्र परीक्षा 2024 परिणाम घोषित #chandrapur

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- 'नृत्यांगण डान्स स्कूल’ या केंद्राच्या विद्यार्थिनींनी ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल, मुंबई’ व्दारा आयोजित 2024, मे महिन्यातील सत्राच्या परीक्षेत ‘कथक’ या शास्त्रीय नृत्य शैलीत केंद्राचा एकूण 100 टक्के परिणाम प्राप्त करून उत्कृष्ट यश संपादन केले आहे. "कथा कहे सो कथक कहलावे", "कथक" या शास्त्रीय नृत्याचा उत्तरोत्तर विकास शहरात व्हावा आणि आपल्या भारतीय संस्कृतीची जोपासना व्हावी या उददे्शाने कु प्राजक्ता लक्ष्मीकांत उपरकर यांनी ‘नृत्यांगण डान्स स्कूल’ या नृत्य केंद्राची स्थापना केली. येथे "कथक" या शास्त्रीय नृत्याचे शुद्ध रूपाने जतन केले जाते.

कथक नृत्याच्या 'प्रवेशिका पूर्ण' परीक्षेत सौम्या लोखंडे आणि तनिष्का चहारे; 'प्रवेशिका प्रथम' परीक्षेत अंजली आक्केवार, जीविका हांडे या विदयार्थीनींनी विशेष योग्यता प्राप्त केली आहे. 'प्रारंभिक' परीक्षेत प्रचिती कत्तूरवार ,अन्वया बोरिवार, सौम्या शिवकर , निर्मयी मामीडवर, सान्वी बेर्डे; "मध्यमा पूर्ण' परीक्षेत स्पृहा देव, रेणुका मामीडवार तर 'प्रवेशिका प्रथम' परीक्षेत कल्याणी भट्टी या विद्यार्थिनींनी परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त केल्याने विदयार्थिनींच्या या अपूर्व यशाबद्दल ‘नृत्यांगण डान्स स्कूल’ च्या संचालिका कु. प्राजक्ता उपरकर(M.A.कथक सुवर्णपदक प्राप्त, कथक नृत्य विशारद) यांनी सगळयांचे मनापासून कौतूक केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतूकांचा वर्षाव होत आहे. याचसोबत बारावी नंतर विद्यार्थ्यांना काही नवीन कुठला कोर्स करायची इच्छा असल्यास कथक नृत्यामध्ये B.A, M.A डिग्री , डिप्लोमा कोर्स करु शकता. एवढेच नव्हे तर शासनाने शास्त्रीय नृत्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष सवलती सुद्धा उपलब्ध करून दिल्या आहेत!

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)