एक दोन नव्हे 5 वेळा त्याने डोक्यात घातला दगड, भर रस्त्यात घेतला जीव #wardha #murder

Bhairav Diwase
0

वर्धा:- देवळी येथे घडलेल्या एका घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सोनेगाव मार्गावर दिवसाढवळ्या भररस्त्यात एका व्यक्तीची दगड घालून हत्या करण्यात आली. या घटनेत 2 महिलाही जखमी झाल्या आहेत. आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरुनच ताब्यात घेतलं.

विनोद डोमाजी भरणे राहणार सोनेगाव (आबाजी) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर करण मोहिते असं आरोपीचं नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, हत्येचं कारण अस्पष्ट आहे. घटनेनंतर स्थानिकांनी आरोपीला ताब्यात घेऊन मारहाण करत होते. त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. सुरक्षेच्या कारणातून आरोपीला वर्धा शहर पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आहे. तर 2 जखमी महिलांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)