सुरजागडच्या हायवाने घेतला मजुराचा बळी #accident #Gondpipari #pombhurna

Bhairav Diwase
0

पोंभुर्णा:- सुरजागड येथून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकने त्याच कंपनीतील एका मजुराचा बळी घेतला. ही भीषण घटना दुपारच्या सुमारास आक्सापूरलगत एक किमी अंतरावर घडली. किशोर चक्रधर गोरंतवार (४३, रा. पोंभुर्णा), असे मृतकाचे नाव आहे.


सुरजागडचा एक हायवा ट्रक केळझरवरून लोहखनिज खाली करून आक्सापूरकडे येत होता. दरम्यान, याच मार्गावर कंपनीचे पिकअप वाहन पंक्चर झाले. या पिकअपमधील किशोर गोरंतवार व अन्य एक मजूर पंक्चर दुरुस्त करीत होते. या उभ्या पिकअपला हायवाने धडक दिल्याने दोघे जखमी झाले. यातील किशोर गोरंतवार यांना जबर मार लागल्याने चंद्रपुरातील खासगी रुग्णालयात भरती केले. मात्र, उपचारादराम्यान दुपारी 3:30 वाजता त्यांचा मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी कंपनीविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला. कंपनीच्या मजुराचा बळी जाऊनही अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)