अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या युवकास अटक #ballarpur #chandrapur

Bhairav Diwase
0
बल्लारपूर:- एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून केरला एक्स्प्रेसमधून बिहारकडे नेत असताना आरपीएफ पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी बल्लारशाह रेल्वेस्थानकावर युवकाला अटक केली. मोहम्मद मिया सलीम (३८, रा. बेलवा बिहार) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी मोहम्मद मिया सलीम हा केरळ राज्यात काम करत होता. दरम्यान, घराशेजारी राहणाऱ्या एका १२ वर्षीय मुलीस मोहपाशात अडकविले व केरला सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून बिहारला घेऊन जात होता. मुलगी घरी नसल्याचे पाहून आई-वडिलांनी मुलगी हरविल्याची तक्रार केरला स्थानकावरील रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपासचक्र फिरवले असता सीसीटीव्ही फुटेजवरून एक युवक मुलीला घेऊन जनरल डब्यात बसताना दिसला. ही माहिती केरला आरपीएफने नागपूर व बल्लारशाह आरपीएफला कळविली.

शुक्रवार सायंकाळी केरला एक्स्प्रेस फलाट क्रमांक ३ वर येताच आरपीएफ कार्यालय निरीक्षक सुनील पाठक, चाईल्ड लाईनचे भास्कर ठाकूर व चमूने आरोपीसह मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर जिल्हा बालकल्याण समितीला माहिती दिली. या अल्पवयीन मुलीला सखी वन स्टाफ सेंटरमध्ये पाठविण्यात आले. पोलिसांनी मुलीच्या कुटुंबाला याबाबत निरोप दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)