सुधीर मुनगंटीवार म्हणतात ‘टायगर अभी जिंदा है’ #ballarpur #chandrapur

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- निवडणूक जिंकून संसदेत गेलो असतो तर रेल्वे कोचचा कारखाना चंद्रपुरात आणण्याचा संकल्प होता. बल्लारपूर ते मुंबई व पुणे अशी थेट गाडी सुरू करण्याची मागणी करण्याचा संकल्प होता. मूर्ती येथील रखडलेले विमानतळ पूर्ण करण्याचा संकल्प होता. अशा अनेक गोष्टींचा विचार केला होता. पण मुनगंटीवार खूप काम करतात त्यांना थोडी आरामाची गरज आहे, असा विचार जनतेने केला असेल. पण जनतेच्या कामासाठी मला फरक पडत नाही कारण ‘टायगर अभी जिंदा है’, असेही ते म्हणाले.


‘मी थकणारा आणि थांबणारा नाही’

लोकांचे प्रेम आजही कायम आहे. याच प्रेमाची ऊर्जा घेऊन काम करायचे आहे. ही निवडणूक विकासाच्या आधारावर नाही तर जातीच्या आधारावर झाली आहे. ही धोक्याची घंटा आहे. समाजात राजकीय कॅन्सर पसरण्याचे संकेत आहेत. या कॅन्सरचा समूळ नायनाट करून विकास करायचा आहे. पुन्हा एकदा शक्तीने काम सुरू करायचे आहे. मी थकलो नाही आणि थांबलोही नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जनतेचे काम करायचे आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)