वडाची पूजा करणाऱ्या महिलांवर मधमाश्यांचा हल्ला #Beeattack #saoli #chandrapur

Bhairav Diwase
0

सावली:- वटपौर्णिमेनिमित्त वडाची पुजा करताना मधमाश्यांने केलेल्या हल्यात चार महिला व एक मुलगा जखमी झाल्याची घटना वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली.



मधमाश्यांने केलेल्या हल्ल्यात ज्योति स्वामी येदनुवार (50), सपना राकेश पत्तिवार (32), माया प्रकाश चेल्लीम्यालवार (66), श्वेता संदीप चेल्लीम्यालवार (25), रक्ष राकेश पत्तिवार (12) असे जखमी झालेल्याची नावे असून ते बोथली येथील रहिवाशी होते.


Also Read:- सुधीर मुनगंटीवार म्हणतात ‘टायगर अभी जिंदा है’

वटपौर्णिमेच्या दिवशी बोथली परिसरातील काही महिला बोथली-हिरपुर मार्गे तलाठी ऑफिस लगत असलेल्या वटवृक्षाच्या झाडाला पुजा करीत असताना त्या झाडालगत असलेल्या पाण्याच्या टाकीवर मधमाशांचे पोळे आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता च्या सुमारापासून वटवृक्षाची पूजा सुरु असताना झाडालगत पाण्याच्या टाकीवर असलेल्या मधमाश्यांने पूजा करणाऱ्या महिलांवर हल्ला केला. अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे भयभीत महिलांनी वटवृक्षापासून पूजा न करता पळ काढला आणि घराचा रस्ता धरला.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)