होतकरू विद्यार्थ्यांसाठी पत्रकार संघाचा पुढाकार हे प्रशासनीय कार्य:- हंसराज अहिर

Bhairav Diwase
0
डिजिटल अभ्यासिकेचे थाटात उद्घाटन

राजुरा:- लोकशाहीत पत्रकारांची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे .वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी व सत्य निर्भीडपणे मांडण्यासाठी पत्रकारानी अग्रेसर असले पाहिजे. पत्रकारांच्या बातम्या मधूनच सभागृहात आवाज उठवण्याची संधी लोकप्रतिनिधींना मिळते. सामाजिक बांधिलकीतून पत्रकार संघाने डिजिटल अभ्यासिका शहरात उपलब्ध करून दिलेली आहे. यामुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहे. सामाजिक बांधिलकी जोपासून पत्रकार संघानी केलेले कार्य प्रशासनीय आहे असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी राजूरा येथे केले.

राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपये खर्च करुन तयार केलेल्या डिजिटल अभ्यासिकेचा उ‌द्घाटन सोहळा आज दि. २३ जुन २०२४ ला पार पडला यावेळी श्री. अहिर बोलत होते. राजुरा तालुका पत्रकार संघाच्या भवनात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहिर, होते तर उद्घाटक म्हणून आमदार सुभाष धोटे होते. प्रमुख अतिथी म्हणून धर्मादाय आयुक्त वकील संघाचे सचिव अँड. मनोज काकडे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुदर्शन दाचेवार, डॉ. सत्यपाल कातकर, सतीश धोटे,पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक बी. यु. बोर्डेवार, कार्याध्यक्ष डॉ. उमाकांत धोटे, सचिव बादल बेले यांची उपस्थिती होती. यावेळी राजुरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने हंसराज अहिर आणि आमदार सुभाष धोटे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

उद्घाटनीय मनोगतातून आमदार सुभाष धोटे यांनी पत्रकारानी निर्भीडपणे जनतेसमोर सत्य मांडावे असे आवाहन केले. सामाजिक कार्यासाठी पत्रकार संघाला नेहमी मदत करण्याचे आश्वासन दिले. डिजिटल अभ्यासिकेचा फायदा या भागातील गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली .याशिवाय पत्रकार संघाला आवश्यक असलेल्या सुविधासाठी काँग्रेसचे आमदार आणि खासदार नेहमी मदत करतील असे आश्वासन दिले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. बी.यु. बोर्डेवार यांनी केले .सूत्रसंचालन आनंद चलाख यांनी केले तर आभार सचिव बादल बेले यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पत्रकार संघाचे पदाधिकारी प्रवीण देशकर ,बाबा बेग, गणेश बेले, आनंद भेंडे, मसुद अहमद, राजेंद्र मोरे, नितीन मुसळे, कृष्णकुमार,राजुरा तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाला राजुरा पत्रकार असोसिएशनचे पदाधिकारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)