Chandrapur Accident : पिकअप-दुचाकीची धडक, दोन युवक ठार #Rajura #gadchandur #accident

Bhairav Diwase
0

राजुरा:- गडचांदूरहून राजुऱ्याकडे येत असलेल्या पिकअपने समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. यात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एक युवक गंभीर जखमी झाला. अपघाताची ही घटना गुरुवार (ता. २०) दुपारी तीन वाजताच्या सुमारास राजुरा-गडचांदूर मार्गावर घडली. मृतांमध्ये सौरभ मारुती बावणे (वय १८ रा. चिचबोडी ता. राजुरा), नैतिक दिलीप लाटेलवार (वय १६ वरूर रोड ता. राजुरा) यांचा समावेश आहे. यश भीमराव रामटेके (वय १८ रा. वरूर रोड ता. राजुरा) हा गंभीर जखमी आहे.



वरुर रोड येथील सौरभ मारुती बावणे, नैतिक दिलीप लाटेलवार आणि यश भीमराव रामटेके हे तिघे एमएच ३४ बीसी ६३५५ या क्रमांकाच्या वाहनाने वरुर रोड येथून गडचांदूरकडे जात होते. एमएच ३४ बीझेड ४९५७ या क्रमांकाची पिकअप गडचांदूरहून राजुऱ्याकडे येत होती. खामोनाजवळील मार्गावर नियंत्रण सुटल्याने दुचाकी आणि पीकपची जोरदार आमने-सामने धडक झाली.


Also Read:- चंद्रपुरात केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन 

यात सौरभ मारुती बावणे आणि नैतिक दिलीप लाटेलवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर यश भीमराव रामटेके हा गंभीर जखमी झाला. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील एक युवक सरळ पीकअपच्या ट्रॉलीमध्ये उसळून पडला. गंभीर युवकाला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे, पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी हे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह व जखमीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयासमोर नागरिकांनी गर्दी केली. काही काळासाठी तणाव निर्माण झालेला होता.


Also Read:- मैदानी चाचणीसाठी उत्तेजित इंजेक्शनचा वापर; उमेदवार ताब्यात 

दिवसेंदिवस गडचांदूर- राजुरा महामार्गावर गेल्या काही दिवसांत अपघातांच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. वाहनांच्या गतीवर नियंत्रण नसल्यामुळे सुसाट वेगाने वाहने धावतात. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, उपपोलिस निरीक्षक पांडुरंग हाके, वाहतूक शाखेचे चंपत बंडी, पवार करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)