चंद्रपूरात वेगवेगळ्या घटनांमध्ये लाच घेताना चौघांना अटक #chandrapur #Bribery #arrest

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी दोन लाच घेतानाच्या घटना मंगळवारी उघडकीस आल्या आहेत. चिमूर पंचायत समितीमध्ये घरकुल बांधकामाच्या निधीसाठी कंत्राटी अभियंत्यासह एका गंवड्याने 10 हजार रुपयाची मागणी केली होती.

यासोबतच शहरातील शासकिय वैद्यकिय महाविद्यालतील वरिष्ठ सहायक आणि वरिष्ठ लिपीक यांनी 10 हजारांची मागणी केली होती. दरम्यान लाच घेतना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांना रंगेहाथ पकडले आहे.

पहिली घटना चिमूर पंचायत समितीमध्ये घडली. तक्रारकर्ता चिमूर तालुक्यातील कळमगाव येथील रहिवासी असून मजुरीचे काम करतात. त्यांना शबरी आवास योजनेअंतर्गत सन 2022-2023 या आर्थिक वर्षाकरिता घरकुल मंजूर झाले होते. सदर घरकुल बांधकामाची रक्कम चार टप्प्यात जमा होते. त्याचे घरकुल योजनेचे दोन हप्ते जमा झाले होते.

दरम्यान तिसरा टप्पा 45 हजार आणि चौथ्था टप्यातील 20 हजार रूपये असे एकूण 85 हजार रूपये जमा करण्याकरीता चिमूर पंचायत समितीमध्ये कार्यरत संशयित आरोपी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी तक्रारदारास 20 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर कंत्राटी अभियंता मिलींद मधुकर वाढई (वय.27) आणि सहकारी गवंडी आशिष कुशाब पेंदाम (वय.28) यांना 10 हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने लाच घेताना अटक केली.

याबद्दलची दुसरी घटना, चंद्रपूर शहरातील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात घडली. वरिष्ठ सहायक अशोक बाबुराव बगुलकर (वय.58) आणि वरिष्ठ लिपीक दिपक केशवराव सज्जनवार (वय.36) यांना वैद्यकिय प्रमाणपत्रासाठी 10 हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली. तक्रारदारांचा मार्च 2022 मध्ये बंगाली कॅम्प चंद्रपूर येथे अपघात झाला होता. त्यानंतर येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. उपचारादरम्यान ते सुट्टीवर होते. उपचारानंतर त्यांना सेवेवर रुजू होण्याकरता वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यामुळे जुन 2024 मध्ये जिल्हा सामान्य रुग्णास चंद्रपूर येथे तपासणी करीता गेले. तपासणी करून फिट फार लाईट डयुटी एक्सपेक्ट ड्रायव्हिंग असा शेरा नमूद करून वैद्यकीय अहवाल कार्यालयात सादर केला होता.

वैद्यकीय अहवालामध्ये ते चालक पदाची कामगिरी करण्याबाबत स्पष्ट नमूद नव्हते, त्यामुळे तक्रारदार यांनी वैद्यकीय मंडळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे वैद्यकीय अहवाल देण्याबाबत अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी आरोपींना भेटून वारंवार वैद्यकिय प्रमाणपत्राची मागणी केली होती. परंतु त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले नाही. अखेर 10 हजाराची लाचेची मागणी करण्यात आली. लाच दिल्याशिवाय काम होणार नाही असा दमही दिला होता. आरोपी दिपक सज्जनवार याने आरोपी बगुलकर यांचेसाठी परिसरात इलेक्ट्रीकल दुकानाचे बाजूला 10 हजाराची लाच स्विकारताना अटक करण्यात आली. चिमूर पंचायत समिती मध्ये कंत्राटी अभियंत्यास एका खासगी गंवडी आणि चंद्रपूर शहरातील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात दोन कर्मचारी असे चौघांना अटक करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)