पोलीस स्टेशनवर हल्ला; पोलीस कर्मचारी जखमी, जिल्ह्यात खळबळ #chandrapur #jalgaon

Bhairav Diwase
0
जळगाव:- जामनेर तालुक्याच्या एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व तिचा खून करून पसार झालेल्या सुभाष उमाजी भिल (वय ३५) या आरोपी सुभाष भिल गुरुवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यानंतर आरोपी आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करत जमावाने जामनेर पोलिस ठाण्यावर हल्ला केला. ही घटना गुरुवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या १० ते १२ जणांना रात्रीच ताब्यात घेतले होते.


यावेळी संतप्त जमावाने पोलीसस्टेशनवर दगडफेकही केली. त्यात पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह १० पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. दगडफेकीनंतर पोलीस स्टेशन आवारात दगडाचा खच पडलेला दिसून आला. दरम्यान जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तरीही जमाव शांत होत नव्हता. जमावाच्या दगडफेकीत पोलिस ठाण्याच्या काचा फुटल्या. संतप्त जमावाने एक दुचाकी जाळली, अनेक वाहनांच्या काचा फोडल्या. पोलिस ठाण्याबाहेर पोलिसांच्या दुचाकींची तोडफोड करण्यात आली.दोन पोलिस गंभीर जखमी जखमी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या दगडफेकीत रामदास कुंभार, हितेश महाजन, रमेश कुमावत, संजय राखुंडे, प्रीतम बरकले, संजय खंडारे, सुनील राठोड, मुकुंदा पाटील हे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.


जामनेर तालुक्यातील एका सहा वर्षीय बालिकेवर एका नराधमाने अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना नऊ दिवसापूर्वी घडली होती. या घटनेतील नराधम हा फरार झालेला होता. त्याला गुरुवारी दि. २० जून रोजी पोलिसांनी शिताफीने भुसावळ तालुक्यात तापी नदीच्या जवळ ताब्यात घेत अटक केली आहे. नराधमाला अटक झाल्याची माहिती जामनेर शहरात पसरताच मोठा जमाव एकत्र झाला. त्यांनी महामार्ग रोखून चौकात टायर जाळत घटनेचा निषेध केला. तसेच नराधम आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली.

या वेळेला पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर संतप्त जमाव जामनेर पोलीस स्टेशनकडे आला. त्यांनी पोलीस स्टेशनवर दगडफेक करीत प्रचंड तोडफोड केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह पोलिसांवर दगडफेक केली. त्यात शिंदे यांच्यासह दहा ते बारा पोलीस जखमी झाले आहेत. तसेच काही नागरिकही जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती वरिष्ठांकडे गेल्यानंतर दंगा नियंत्रण पथकाला जामनेर शहरांमध्ये पाचारण करण्यात आले होते.घटनेमुळे जामनेर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)