चंद्रपूर जिल्ह्यात जादूटाेणाच्या संशयातून वृद्धाची हत्या #chandrapur #nagbhid nagbhid

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मौशी गावात जादुटोणाच्या संशयावरून एका वृद्धाची हत्या झाल्याचा प्रकार समाेल आला आहे. आसाराम दोनाडकर (वय 67) असं मृत वृद्धाचे नाव आहे.



पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार गुरुवारी रात्री आठच्या सुमारास आसाराम दोनाडकर यांच्या घरावर काही लोकांचा जमाव चाल करून गेला. जादूटोणा करतो म्हणून त्यांच्याशी जमावाने वाद घातला. दोनाडकर यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण देखील झाली. त्यांना मारहाण हि बेशुद्ध होईपर्यंत झाली. काहींनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळी नागभीड पोलिस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड यांनी भेट दिली.


Also Read:- Police Bharti 2024: जिथे पाऊस तिथे पोलीस भरती पुढे ढकलली; देवेंद्र फडणवीसांची माहिती 

या प्रकरणी पाेलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे यात संतोष जयघोष मैंद (वय 26), श्रीकांत जयघोष मैंद (वय 24), रुपेश देशमुख (वय 32) या संशियत आरोपींची नावे आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)