मी कॉंगेसचा निष्ठावंत कार्यकर्ता; माझ्यावरचे आरोप निराधार व बिनबुडाचे:- वासुदेव पाल #chandrapur #pombhurna #congress

Bhairav Diwase
0

"त्यांचा" बोलावता धनी कोण? कॉंगेस कार्यकर्ते शोध घेणार का?
पोंभुर्णा:- पोंभूर्णा तालुका काँग्रेस कमेटीचे तत्कालील अध्यक्ष रवि मरपल्लीवार यांनी ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे पोंभूर्णा तालुका काँग्रेस कमेटीचे पद रिक्त असल्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस कमेटी अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी मुंबई, नाना पटोले अध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमेटी यांच्या मान्यतेने जिल्हा काँग्रेस कमेटी अध्यक्ष सुभाष धोटे यांनी दिनांक २६/०६/२०२४ ला पोंभुर्णा तालुका काँग्रेस कमेटीच्या अध्यक्ष पदावर वासुदेव गोपाळराव पाल यांना नियुक्ती पत्र देऊन 'तालुका अध्यक्ष' जाहिर केले. याबाबत काही असंतुष्ट लोकांनी दिनांक २७/०६/२०२४ ला प्रेस कॉन्फरन्स घेऊन पक्ष विरोधात बदनामीकारक वृत्त प्रकाशित करीत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत वासूदेव पाल यांनी दिली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी मुंबई यांचे निदर्शनात जिल्हा अध्यक्ष सुभाष धोटे यांचे अध्यक्षतेखाली दिनांक ३१/०५/२०२४ ला सायं. ७.०० वा. पोंभूर्णा येथे बैठक आयोजित करण्याबाबत सुचनेनुसार घनश्याम मुलचंदानी प्रदेश सदस्य व डॉ. विश्वास झाडे यांचे प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीबाबत तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांना सुचना देण्यात आल्या. बैठकीला शहर/ ग्रामीण ५३ कार्यकर्ते उपस्थित राहुन बैठकीचे कामकाज चालविण्यात आले.

जिल्हा अध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व आवश्यक निवडी संबंधाने सुचना दिल्यावरुन कार्यकर्त्यांकडून (ग्रामीण) नावे मागविण्यात आलेल्या शहरी / ग्रामीण नावावर विचार करण्यात आले.

कार्यकर्त्यांकडून आलेल्या नावावर व प्रत्यक्ष त्यांचे आजपर्यंत केलेल्या कार्यावर व सांभाळलेल्या पदाचे अनुभवाबाबत त्यांची योग्यता हेरुन आम्ही आवश्यक मार्गदर्शनानुसार नियुक्ती करण्याबावत आश्वत करण्यात आले.

तालुका अध्यक्ष काँग्रेस कमेटी पोंभूर्णा पदावर वासुदेव पाल यांचे नियुक्ती झाल्यानंतर काही असंतुष्ट लोकांनी दिनांक २७/०६/२०२४ ला पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याबाबत विश्वासात न घेता निवड प्रक्रिया केल्याबाबत निराधार आरोप केले. त्यांनी केलेले आरोप निराधार व बिनबुडाचे असून पक्षनिष्ठेच्या विपरीत आहेत. निवडप्रक्रिया ही पक्ष संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात आली असून पक्षाचे निरंतर व अनुभवाचा पक्ष बांधणीत फायदा होण्याच्या दृष्टीने निवड केली आहे. काही असंतुष्ट व काही "बोलविता धन्याच्या" इशाऱ्यावरुन निराधारतेचे आरोप करुन पक्षाला व संघटनेला बदनाम करण्याचा षडयंत्र आहे. असे वासूदेव पाल यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले.

याला कोणताही कार्यकर्ता या षडयंत्राला बळी पडणार नाही, उलट पक्षाचे असंतुष्ट कोण याची खात्री होईल. पुढील दृष्टीने संघटनेमध्ये काम करतांना सर्वसमावेशक काम करुन काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार काम करुन पक्ष मजबुत करण्याचे काम करु.

या पत्रकार परिषदेला नवनियुक्त कॉंगेस तालुकाध्यक्ष वासुदेव पाल, ओमेश्वर पद्दमगिरीवार, ईश्वर पिंपळकर, वसंतराव मोरे, जयपाल गेडाम तसेच कॉंगेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

"त्यांचा" बोलावता धनी कोण? कॉंगेस कार्यकर्ते शोध घेणार का?

"बोलावता धन्याच्या" इशाऱ्यावरुन निराधारतेचे आरोप करुन पक्षाला व संघटनेला बदनाम करण्याचा षडयंत्र आहे. असं तालुकाध्यक्ष म्हणताचं पत्रकार परिषदेत पत्रकारांनी "तो" बोलावता धनी कोण? असा प्रश्न विचारला असता याबद्दल कुठलीही माहिती पाल यांच्याकडून देण्यात आली नाही. मात्र बोलवता धनी कोण? याचा शोध काँग्रेस कार्यकर्ते घेतील का? असा प्रश्न पडला आहे. 'बोलावता धनी कोण?' हा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता वासुदेव पाल यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)