सिंदेवाही तालुक्यात ग्रा.पं.निवडणुकीची रंगणार रंगत #chandrapur #sindewahi

Bhairav Diwase
0
सरपंच पदाचे ठरणार आरक्षण
सिंदेवाही:- तालुक्यातील दिनांक ०१ जानेवारी २०२४ ते ०४ मार्च २०२५ या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत पवनपार,पवनाचक,सिंगडझरी,जामसाळा या गावातील सरपंच पदाची आरक्षण सोडतीचे पत्र ग्रामपंचायत कार्यालयात धडकले असून गावात सरपंच पदासाठी ग्रा.पं.निवडणुकीची आतुरतेने प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांची आत्ता प्रतीक्षा संपणार आहे.

मा.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल रिट याचिका क्र. ४६७१/२०२३ गुणवंत काळे वि. महाराष्ट्र शासन व इतर मध्ये दि. १०-१०-२०२३ रोजी दिलेल्या आदेशानुसार शासन अधिसूचना क्र. १४३ दि.१४-०३-२०२४ नुसार ०५-०३-२०२० ची अधिसूचना अधिक्रमीत करून दिनांक ०१ जानेवारी २०२४ ते ०४ मार्च २०२५ चा कालावधीसाठी शासणाकडून सरपंचाचे आरक्षण नव्याने निश्चित करण्याच्या सूचना आहे.त्यानुसार तालुकानिहाय अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणी खुल्या प्रवर्गातील महिलांकरिता सरपंच पदाचे आरक्षण आयोगाने दिल्या प्रमाणे सिंदेवाही तालुक्यातील चार ग्राम पंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढायचे सुचित केले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत(सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील नियम (५)(६)प्रमाणे दिनांक २४-०६-२०२४ रोजी दुपारी ०२:००वाजता पंचायत समिती सभागृह, सिंदेवाही घेण्यात येणार आहे. तेव्हा संबधित सरपंच व ग्रामपंचायतीचे सदस्य यांना सभेच्या दिवशी वेळेवर हजर राहण्याच्या सूचना तहसील कार्यालय सिंदेवाही मार्फत दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)