"त्या" हत्या प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या #chandrapur #warora #suicide

Bhairav Diwase
0

वरोरा:- चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन सेवा प्रकल्पात ४ दिवसांपूर्वी झालेल्या विवाहितेच्या हत्या प्रकरणातील आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे. आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव समाधान माळी असे आहे.


वरोरा येथील बाबा आमटे यांच्या कर्मभूमीत २६ जूनला आरती दिगंबर चंद्रवंशी (वय २५) या विवाहितेची हत्या करण्यात आली होती. हिंगणघाट येथील सासर सोडून आरती काही महिन्यांपासून आपल्या आई- वडिलांसोबत वास्तव्याला होती. आरोपी समाधान माळी हा कुष्ठरोगी असल्याने तो एक वर्षाआधी आनंदवनात उपचाराला आला होता. तिथेच त्याचा परिचय आरतीशी झाला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र त्याने आरतीची हत्या केली होती. आरतीच्या हत्येमागे लव्ह-ब्रेकअप-मर्डर असे वळण असल्याचे पोलिस तपासात समोर आले. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवित आरोपी समाधान माळी याला चोवीस तासात अटक केली.


या प्रकरणातील आरोपी समाधानला पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मात्र, आरोपीने रात्री पोलीस कोठडीत गळफास घेत आत्महत्या केली. बुटाच्या लेसचा आत्महत्येसाठी वापर करण्यात आल्याची प्राथमिक माहीती पुढे येत आहे. घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)