चंद्रपुरच्या आदर्श मास्टेने 'माउंट फ्रेंडशिप शिखर' केले यशस्वीरित्या सर #chandrapur

Bhairav Diwase
0


चंद्रपूर:- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील सरदार पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी आदर्श साईनाथ मास्टे याने हिमालयातील पीर पंजाब रंगातील १७ हजार ३४६ फूट उंचीचे ''माउंट फ्रेंडशिप शिखर'' यशस्वीरित्या सर केले. दरम्यान जागतिक योग दिनानिमित्त सकाळी ८ वाजता भारतीय तिरंगा दिमाखाने फडकवत राष्ट्रगीत गायन व योगासन करून पूर्ण करून मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.


''माउंट फ्रेंडशिप शिखर'' ही मोहीम दिल्ली येथील (आय.एम.एफ.) इंडियन माउंटनेरींग फाउंडेशन अंतर्गत १६ जून २०२४ ते २३ जून २०२४ या कालावधीत झाली. संपूर्ण भारतातून १४ गिर्यारोहकांची यासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी ६ गिर्यारोहकांनी यशस्वी चढाई केली. त्यात चंद्रपूरचा सरदार पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थी आदर्श साईनाथ मास्टे देखील त्यात सहभागी होता. उर्वरित हवामानामुळे काही अंतरावरून गिर्यारोहकांनी माघार घेतली. उणे -२० अंश सेल्सिअस तापमानात आपल्या २१ महाराष्ट्र बटालीयन एनसीसी वर्धेचे पहिले कैडेट ठरले आहेत. या आधी आदर्श साईनाथ मास्टेने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२३ रोजी हिमालयातील चंद्रभागा पर्वत रंगातील माउंट यूनान (ऊंची ६ हजार १११ मीटर) वर चढाई केली होती,तसेच १७ नोव्हेंबर २०२० रोजी हिमालयातील धोलाधर पर्वत रंगातील माउंट पतालसू (ऊंची ४ हजार २२० मीटर) वर चढाई केली होती हे विशेष. सदर मोहीम यशस्वीततेसाठी प्राचार्य डॉ. पी. एम.काटकर यांच्या मार्गदर्शनात उपप्राचार्य डॉ.स्वप्नील माधमशेट्टीवार एनसीसी विभाग प्रमुख डॉ.सतीश कन्नाके यांनी परिश्रम घेतले. आदर्श साईनाथ मास्टे याने सदर शिखर गाठल्याचा महाविद्यालयाला अभिमान असून त्याच्या पुढील वाटचालीसाठी प्राचार्य डॉ. पी. एम.काटकर यांनी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, सदस्य आ. किशोर जोरगेवार, सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, संदीप गड्डमवार, सुरेश पोटदुखे, जिनेश पटेल, चंद्रशेखर वाडेगावकर यांनी या यशाबद्दल आदर्शचे अभिनंदन केले आहे. या यशाने महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्या गेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)