'सामना' ने दिला चंद्रपूरला धक्का! #Chandrapur

Bhairav Diwase
0

शेकडो शिवसैनिक राजीनामा घेऊन मुंबईला रवाना

चंद्रपूर:- शिवसेना ( उबाठा ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्ह्यात दोन विधानसभा क्षेत्राकरिता एक जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांची वरोरा, चंद्रपूर विधानसभा,संदीप गि-हे-बल्लारपूर, राजुरा विधानसभा तर मुकेश जिवतोडे-चिमूर,ब्रह्मपुरी विधानसभा अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नियुक्तीमुळे जिल्हातील शिवसेनेत वादळ उठलं आहे. जवळपास शंभरच्या वर शिवसैनिक राजीनामा देण्यासाठी चंद्रपूर येथून मुंबईकडे निघाले आहेत.


चंद्रपूर जिल्हात शिवसेनेकडून ( उबाठा ) दोन जिल्हा प्रमुख नियुक्त करण्यात आले होते. तीन विधानसभा क्षेत्राची जवाबदारी एका जिल्हा प्रमुखांकडे देण्यात आली होती. आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून जिल्हात जिल्हा प्रमुखांना दोन नियुक्ती केल्याचे वृत्त धडकले. त्यानुसार दोन विधानसभा क्षेतकरिता एक जिल्हा जिल्हा प्रमुख अशी नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांची वरोरा, चंद्रपूर विधानसभा,संदीप गि-हे-बल्लारपूर, राजुरा विधानसभा तर मुकेश जिवतोडे-चिमूर,ब्रह्मपुरी विधानसभा अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.या नियुक्तीमुळे नाराज झालेले जिल्हा प्रमुख यांनी आपल्या समर्थकांना घेऊन राजीनामा देण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.त्यात तालुका प्रमुख, प्रमुख पदाधिकारी यांचा समावेश आहे.संजय राऊत यांच्या बद्दल चंद्रपूर शिवसेनेत कमालीची नाराजी दिसत आहेत. मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेचे प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी उचललेल्या टोकाचा निर्णयाने चंद्रपूर उबाठा मध्ये वादळ उठले आहे.


शिंदे नकोसे...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाच्या वतीने वरोरा विधानसभा व चंद्रपूर विधानसभा क्षेत्राकरिता जिल्हाप्रमुख म्हणून रवींद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीचा विरोध करत जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांचे समर्थक आक्रमक झाले. निष्ठावंत शिवसैनिक विश्वासात न घेता पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाचा सर्व शिवसैनिकांनी जिल्हा कार्यालय समोर निषेध व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत रवींद्र शिंदे यांनी महाविकास आघाडीला मदत न करता भाजपचा प्रचार केला असा आरोप या शिवसैनिकांचा आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटात मोठ्या प्रमाणात नाराजीचा सुर बघायला मिळत आहे. 


वरोरा - भद्रावती विधानसभा शिवसेनेचा गड मानला जातो. मात्र अचानक विधानसभेच्या निवडणुका आधी करण्यात आलेल्या फेर बदलामुळे शिवसेनेची संपवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे. आता विधानसभेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईसाठी रवाने झाले असून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपली आपबिती सांगणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना उबाठा गटात मोठा राजकीय भूकंप होण्याची चर्चा वर्तविली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)