Maharashtra Police Bharti: मैदानी चाचणीसाठी उत्तेजित इंजेक्शनचा वापर; उमेदवार ताब्यात #beed #Maharashtrapolice

Bhairav Diwase
0

बीड:- पोलीस भरतीच्या (Police Bharti 2024) उमेदवाराकडे उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन (Stimulant Injection) सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 19 जूनपासून राज्यात मोठी पोलीस भरती (Police Bharti) सुरू झाली आहे.


Also Read:- संपत्तीचा वाद विकोपाला गेला; लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून

महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील 17 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीसाठी 17 लाख 76 हजार 256 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यादरम्यान, बीडमधील पोलिस भरतीवेळी उमेदवाराकडे उत्तेजित द्रव्य सापडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मांडवजाळीचा सुनील बहिरवाळ (वय 24) हा युवक मैदानी चाचणीसाठी उत्तेजित द्रव्याचं इंजेक्शन घेऊन आला होता. पोलिसांनी त्याला मैदानात सोडताना त्याची तपासणी केली. यावेळी त्याच्या बॅगमध्येही उत्तेजित द्रव्याचे इंजेक्शन पोलिसांना आढळून आले. या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून शिवाजी नगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.


Also Read:- चंद्रपुरात केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन 


उमेदवार पोलिसांच्या ताब्यात, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू


बीडमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती दरम्यान एका उमेदवाराकडे उत्तेजित द्रव्याचे इंजेक्शन आढळून आलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत, संबंधित उमेदवाराला ताब्यात घेतले आहे. आता या इंजेक्शनची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिला आहे. अन्न आणि औषध भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी सॅम्पल घेण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. उमेदवाराकडे आढळलेल्या इंजेक्शनचे सॅम्पल मुंबई येथे प्रयोगशाळेकडे पाठवले जाणार आहेत. दरम्यान, बीडमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरतीदरम्यान अशी घटना घडल्याने आता पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलिसांनी उमेदवारांच्या बॅगांची देखील आता कसून तपासणी केली जाणार आहे.

Also Read:- Chandrapur Accident : पिकअप-दुचाकीची धडक, दोन युवक ठार


टर्मिन इंजेक्शन असल्याचा संशय


पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे व्यायाम करताना कुठलाही थकवा येऊ नये, यासाठी मीफेट्रामाईन घटक असलेले 'टर्मिन' नावाचे इंजेक्शन (Termin Injection) घेतले जाते. पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे सापडलेले इंजेक्शन तेच असावे, असा अंदाज आता अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. इंजेक्शन तपासणीसाठी पाठवण्यात आल्याने प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच याबाबत अधिकृत माहिती मिळू शकणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)