सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी गडचिरोलीची "मनी" @Mnii0

Bhairav Diwase
0

मोनाली एकनाथ सहारे (mnii0_____) गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरमोरी गावात 27 सप्टेंबर 2001 ला शेतकऱ्यांच्या घरात जन्म घेतली. मोनालीचे बी. ए तृतीय वर्षांचे शिक्षण पूर्ण झाले असून आता एम. ए प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणार आहे. मोनालीने mnii0 नावाने इंस्टाग्रामवर अकाउंट तयार केला. तिने एक व्हिडिओ तयार केला आणि अपलोड केला. त्या व्हिडिओने अनेकांना भुरळ पडली. नंतर मोनालीने गावठी व झाडीबोली भाषेत स्वतःचे व्हिडिओ आणि ब्लॉग तयार करून सोशल मीडियावर अपलोड करू लागली. बघता बघता सोशल मीडियाच्या माध्यमातून मोनाली 4 महिन्याच्या आत सर्वांच्या परिचयाची झाली. सोशल मीडियावर मोनाली धुमाकूळ घालत असून सध्या (mnii0_____) या इंस्टाग्राम वर 117k फॉलोवर्स असून तिला सर्व "मनी" या नावाने ओळखतात.

मोनालीचे व्हिडिओ लहानपणापासून ते ज्येष्ठांपर्यंत लोकांना पाहायला आवडतात. व्हिडिओला लोकांचा पाठिंबा हा तिच्या जीवनाची प्रेरक शक्ती आहे. सर्व कलाकारांप्रमाणे तिचे जीवन संकटे आणि यशाने भरलेले आहे. ती प्रामाणिक आणि मूळ काम करण्यासाठी लाजत नाही. व्हिडिओ बनविण्यासाठी तिची आई सपोर्ट करते.


मोनाली आपल्या जीवनात काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करते आणि कधीही हार मानत नाही. मोनाली म्हणते 'सामग्री तयार करण्यासाठी तुम्हाला नेहमीच उत्तम सेटअपची आवश्यकता नसते, परंतु आमच्या हातात असलेल्या गोष्टीद्वारे कला तयार केली जाऊ शकते.'


मोनालीने आपल्या कामाची सुरुवात मोबाईल फोनच केली. तिच्या गावातील मित्र व तिची आई व्हिडिओ तयार करण्यासाठी मोनालीला मदत करू लागले. तसेच व्हिडिओमध्ये काम सुद्धा करू लागले. मोनाली म्हणते 'तुमच्या करिअरचा निर्णय घेणाऱ्या लोकांसमोर तुमची प्रतिभा दाखवण्यासाठी तुम्हाला मुंबई किंवा दिल्लीला जाण्याची गरज नाही तुम्ही फक्त जागे व्हा, तुमचा मोबाईल घ्या आणि लिहा, शूट करा संपादित करा. मोनालीने कमी वयात इंस्टाग्राम च्या माध्यमातून प्रसिद्ध व्यक्ती झाली आहे. येणाऱ्या काळात भरपूर फॉलोवर्स वाढतील हीच अपेक्षा व शुभेच्छा.

लेख:- भैरव धनराज दिवसे (चंद्रपूर)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)