Police Bharti : पोलिस भरतीमध्ये १ लाख २० हजार उमेदवारांवर वयोमर्यादेचं संकट; शेवटची संधी देण्याची मागणी #chandrapur #policeBharati

Bhairav Diwase
0
मुंबई:- लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्य सरकारने विविध विभागांमध्ये भरती प्रक्रिया राबवली होती. त्यातल्या काही विभागांच्या भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या असून अनेक विभागांच्या प्रक्रियेमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडथळे निर्माण झाले होते.


राज्यातल्या तरुणांचा एक मोठा वर्ग पोलिस भरतीची आस लावून बसलेला होता. वर्षानुवर्षे केलेली तयारी कामी यावी, यासाठी तरुण प्रयत्न करत असतात. पोलिस भरतीमध्ये लेखी परीक्षेसह फिजिकल टेस्ट द्यावी लागते. त्यामुळे अनेकजण ग्राऊंडवर तयारी करत असतात. परंतु अशी तयारी करणाऱ्या राज्यातल्या १ लाख २० हजार उमेदवारांना उशिरा होणाऱ्या परीक्षेचा फटका बसण्याची शक्यता आहे.


कोविड काळामध्ये पोलिस भरती रखडल्याने वयोमर्यादेत दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आलेली होती. वयाची अट ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत शिथील करण्यात आलेली होती. मात्र त्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षण देण्यासंबंधी निर्णय घेतल्यानंतर भरतीचा विषय लांबणीवर पडला.


चालू वर्षात २०२४ मध्ये पोलिस भरती परीक्षा होणार आहे. परंतु वयोमर्यादा पार केलेल्या १ लाख २० हजार परीक्षार्थींना उशिरा होणाऱ्या परीक्षेचा फटका बसू शकतो. पुन्हा एकदा वयोमर्यादेमध्ये मुदतवाढ देत शेवटची संधी द्यावी, अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)