शिवसेनेने फुंकले बल्लारपुर विधानसभेचे रणशिंग! #Pombhurna #mul

Bhairav Diwase
0

पोंभुर्णा:- पोंभूर्णा व मुल येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या बुध व बिएलओ प्रमुखांची बैठक पोंभूर्णा येथील संत जगनाडे महाराज व मुल येथील भागेरेखा सभागृह येते घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील बुध प्रमुख व बिएलओ प्रमुखांची व गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

आगामी विधानसभा निवडणुकीच्यां अनुषंगाने शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी बुध, बिएलओ व गावप्रमुखांना सर्वांना पक्ष संघटन विस्तार व बुध सक्षम करण्याकरिता मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी तालुका प्रमुख तथा नगर पंचायतचे विरोधी पक्षनेता आशिष कावटवार व शहर प्रमुख तथा नगरसेवक गणेश वासलवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर मुल येथे ही बैठक घेण्यात आली आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील प्रत्येक गावात, वार्डात, प्रभागात शिवसेनेचा कार्य,चिन्ह पोहचवा व समस्या विरुध्द उठाव करा शिवसेनेचा ब्रीद ८०% समाजकारण व २०% राजकारण या प्रमाणे करा असे बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी आवाहन करण्यात आले.यावेळी तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार व तालुक्यातील शिवसेना पक्षाचे सरपंच,उपसरपंच,सदस्य व नगरसेवक,पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)