Pratibha Dhanorkar: संसदेच्या पायऱ्या चढताना प्रतिभा धानोरकर झाल्या भावूक #chandrapur #chandrapurloksabha

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला. चंद्रपूर वणी आर्णी मतदारसंघात खा. प्रतिभा धानोरकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत पहिल्यांदाच संसदेत जाण्याचा मान मिळवला. सोमवारी त्या नवीन संसद भवनात दाखल झाल्या. संसदेत पोहचल्यानंतर प्रतिभा धानोरकर भावूक झाल्या. संसदेच्या पायरीवर डोक ठेऊन नतमस्तक झाल्या. नवीन संसद भवनात पहिल्यांदाच खा. प्रतिभा धानोरकर खासदार म्हणून आज शपथ घेतली

"मी प्रतिभा सुरेश धानोरकर लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारा थापित झाले आहे अश्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रध्दा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमत्वा व एकात्मता उन्नत राखील. आणि जे कर्तव्य मला प्राप्त होत आहे. ते नेखीने पार पाडील". जय हिंद जय संविधान. आज खा. प्रतिभा धानोरकरांनी मराठीतून खासदारकीची शपथ घेतली.

 धानोरकरांनी घेतली खासदारकीची शपथ

लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर देशभरातील खासदार संसदेत दाखल झाले आहेत. 18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात खा. प्रतिभा सुरेश धानोरकर यांनी आज खासदार सदस्यत्वाची शपथ घेतली.

कोण आहेत खा. प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा धानोरकर यांचा मोठा विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे दिग्गज सुधीर मुनगंटीवार यांच्यावर अडीच लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजय मिळवलाय. या मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल अनेक अर्थाने महत्त्वाचा होता. या मतदारसंघातून भाजपने वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना मैदानात उतरवलं होतं, तर काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर या मैदानात होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला राज्यात फक्त चंद्रपूरमध्ये जागा राखता आली होती. या जागेवर काँग्रेसचे बाळू धानोरकर विजयी झाले होते. पण, त्यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना २०२४ साठी तिकीट देण्यात आले. त्यांनी देखील चंद्रपूर काँग्रेसकडेच राखला आहे.


सुधीर मुनगंटीवारांना धानोरकरांनी दिला धक्का! चंद्रपूर पुन्हा काँग्रेसकडे

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला आहे. प्रतिभा धानोरकर यांना एकूण 7 लाख 18 हजार 410 मत मिळाली, सुधीर मुनगंटीवार यांना 4 लाख 58 हजार 004 मत मिळाली. प्रतिभा धानोरकर यांनी 2 लाख 60 हजार 406 मतांनी विजय मिळवला.

2019 मध्ये पहिल्यांदा विधानसभेच्या निवडणूकिच्या रिंगणात

प्रतिभा धानोरकर या यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील परमडोह इथल्या आहेत. हाच वणी विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येतो. वणी माहेर आणि सासर चंद्रपूर असल्याने दोन्हीकडून त्यांना राजकीय फायदा होतो. त्यांनी उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना 'लेक वणीची, सून चंद्रपूरची' असा प्रचार सुरू केला होता. बाळू धानोरकर वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते तोपर्यंत प्रतिभा या राजकारणात प्रत्यक्ष सक्रीय नव्हत्या. पती राजकारणात आणि पत्नी समाजकार्यात असं समीकरण होतं. पण, 2019 ला बाळू धानोरकर लोकसभेवर निवडून गेले आणि प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसकडून वरोरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली. त्या सक्षम उमेदवार ठरणार नाही, असे अंदाज अनेकांनी बांधले होते. परंतु धानोरकर विजयी झाले

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)