Pratibha Dhanorkar: "मी प्रतिभा सुरेश धानोरकर लोकसभेची सदस्य.....," खासदार म्हणून संसदेत शपथ

Bhairav Diwase
0


चंद्रपूर:- लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला. चंद्रपूर वणी आर्णी मतदारसंघात खा. प्रतिभा धानोरकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत पहिल्यांदाच संसदेत जाण्याचा मान मिळवला. सोमवारी त्या नवीन संसद भवनात दाखल झाल्या. संसदेत पोहचल्यानंतर प्रतिभा धानोरकर भावूक झाल्या. संसदेच्या पायरीवर डोक ठेऊन वंदन केले. नवीन संसद भवनात पहिल्यांदाच खा. प्रतिभा धानोरकर खासदार म्हणून आज शपथ घेतली

"मी प्रतिभा सुरेश धानोरकर लोकसभेची सदस्य....."

"मी प्रतिभा सुरेश धानोरकर लोकसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारा थापित झाले आहे अश्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रध्दा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमत्वा व एकात्मता उन्नत राखील. आणि जे कर्तव्य मला प्राप्त होत आहे. ते नेखीने पार पाडील. जय हिंद जय संविधान. आज खा. प्रतिभा धानोरकरांनी मराठीतून खासदारकीची शपथ घेतली.

खासदारकीची शपथ

लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर देशभरातील खासदार संसदेत दाखल झाले आहेत. 18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात खा. प्रतिभा सुरेश धानोरकर यांनी आज खासदार सदस्यत्वाची शपथ घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)