जय शाहने आपले वचन केले पुर्ण! #T20WORLDCUPWINNER

Bhairav Diwase
0

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी जिंकल्यानंतर बार्बाडोसमध्ये फडकवला ध्वज


IND vs SA ICC T20 World Cup 2024 Final: टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND vs SA T20 World Cup 2024 Final) भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकासोबत बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषकावर कब्जा केला आहे. घरच्या मैदानावर भारताने एकदिवसीय विश्वचषक गमावल्यानंतर संपूर्ण देशाचा उत्साह कमी झाला होता आणि रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर जय शाहने भारताला टी-20 कप जिंकून बार्बाडोसमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्याचे आश्वासन दिले. टीम इंडियाच्या विजयानंतर रोहित शर्माने बार्बाडोसमध्ये ते वचन पूर्ण केले.

पाहा व्हिडिओ....

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)