भाजपाकडून पाच जणांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर #chandrapur #Mumbai #bjp

Bhairav Diwase
0
मुंबई:- विधानसभा सदस्याच्या कोट्यातून विधानपरिषदेचे सदस्य निवडून देण्यात येणार आहेत. विधानपरिषदेच्या अकरा जागा रिक्त असून, त्यातील पाच जागा भाजपला (BJP) मिळणार आहेत. भाजप केंद्रीय नेतृत्वाने पाच नाव निश्चित केले आहे. ओबीसी नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), पुण्याचे योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. यादीत चार नावे हे ओबीसी समाजातील आहे. तर एक उमेदवार हे दलिस समाजातील आहेत.

भाजपने उमेदवारी जाहीर करताना सामाजिक समिकरणेही जुळवून आणले आहे. ओबीसी नेत्यांबरोबर दलित समाजाला उमेदवारी दिली आहे. यातील अमित गोरखे हे नवे नाव आहे. ते पिंपरी चिंचवड येथील रहिवासी आहेत. ते भाजपच्या आयटी सेलचे ते काम पाहतात. ते दलित समाजातून येतात. पुण्यातून योगेश टिळेकर यांनाही उमेदवारी मिळाली आहे. टिळेकर हे भाजपचे हडपसरचे मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. ते भाजपच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत.

तर रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांनाही विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली आहे. महायुतीतील घटक पक्ष म्हणून भाजपने स्वतःच्या कोट्यातून खोत यांना उमेदवारी दिली आहे. सदाभाऊ खोत या पूर्वी विधान परिषदेवर होते. त्यांना भाजपने मंत्रिपदही दिले होते. तर डॉ. परिणय फुके यांना उमेदवारी मिळाली असून, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहे. फुके हे भंडारा जिल्ह्यातील आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)